Home गडचिरोली कोपरअल्ली येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उदघाट

कोपरअल्ली येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उदघाट

133

*कोपरअल्ली येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उदघाटन*

 

मुलचेरा –

मुलचेरा येथील स्व. श्री. मल्लाजी आत्राम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मुलचेरा या महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे उदघाटन श्री. मनोजभाऊ बंडवार उपसरपंच ग्रा. पं. कोठारी यांच्या हस्ते दिनांक 27/02/2023 रोजी पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. पी. एल. ढेंगळे उपस्थित होते. प्राचार्य ढेंगळे 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून सौ. प्रगतीताई बंडावार माजी उपसभापती पं. स. मुलचेरा, श्री. रवींद्रजी झाडें माजी उपसरपंच ग्रा. पं. कोठारी, श्री. याकूबजी बानोत, श्री. पत्रुजी कोडापे, श्री. बंडुजी आलाम नगरसेवक मुलचेरा, प्रा. नितेश बोरकर, प्रा. दीपक सहारे, श्री. नितेश झाडें, श्री रुपेश वाग्दरकर, श्री. कमलेश निमगडे, श्री. आदित्य चिप्पावार, श्री. राकेश नासानी, श्री. भाऊजी रापंजी, कु. विद्या देठे तसेच रासेयो स्वयंसेवक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमरदीप रामटेके तर आभारप्रदर्शन प्रा. राष्ट्रपाल गायकवाड यांनी केले.

Don`t copy text!