*रोजगार निर्मिती व लघु उद्योजकांना फायदेशीर ठरणारे पूर्व विदर्भातील दुर्लक्षित पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करा : हेमंत गडकरी*
पूर्व विदर्भातील नागपूर सहित गोंदिया,भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली,वर्धा जिल्ह्यात अशी अनेक चांगली पर्यटन स्थळ व काही दुर्लक्षित स्थळांचा विकास केल्यास त्याचा स्थानिक रोजगार निर्मिती व लघु उद्योजकांना नक्कीच फायदा होईल त्यासाठी राज्याचा जो अर्थ संकल्प येत्या 9 मार्चला जो महाराष्ट्राच्या विधिमंडळात सादर केला जाणार आहे त्यात या स्थळांचा विकासाकरिता भरीव तरतूद करण्यात यावी असे सूचना करणारे निवेदन मनसेचे प्रदेश सरचिटणीस व शिवराज प्रतिष्ठान नागपूर चे अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
या सहा जिल्ह्यात अनेक ठिकाणी निसर्गाचे वरदान लाभले आहे,सुंदर जलाशय निसर्गरम्य परिसर आहे मात्र येणाऱ्या पर्यटकांना लागणारी निवास व भोजन व्यवस्था नसल्याने या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची रीघ लागेल,त्याच प्रमाणे राज्याच्या पर्यटन प्रेमींना या स्थळांची माहिती होण्यासाठी पर्यटन विकास मंडळाने व स्थानिक प्रशासनाने योग्य पाऊले उचलली तर या भागात लघु उद्योजकांना व बेरोजगारांना रोजगार निर्मितीत नक्कीच चांगल्या प्रमाणात होईल असेही हेमंत गडकरी यांनी म्हंटले आहे.
या निवेदनात पर्यटन स्थळांच्या नावांची विस्तृत माहिती दिली आहे, निवेदनाची प्रत राज्याचे पर्यटन मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांनाही पाठविली आहे