Home गडचिरोली शौर्य आणि शौर्याचे प्रतिक म्हणजे क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके – प्रमोदभाऊ चिमुरकर...

शौर्य आणि शौर्याचे प्रतिक म्हणजे क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके – प्रमोदभाऊ चिमुरकर माजी जि. प. सदस्य, चंद्रपूर*

87

*शौर्य आणि शौर्याचे प्रतिक म्हणजे क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके – प्रमोदभाऊ चिमुरकर माजी जि. प. सदस्य, चंद्रपूर*

 

*ब्रम्हपुरी येथे क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके जयंती साजरी*

 

ब्रम्हपुरी/

या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यापैकीच एक आपल्या क्षेत्रातील थोर क्रांतिवीर शहीद बाबुराव पुलेसुर शेडमाके असून त्यांनी इंग्रजांच्या जुलूमशाहीविरुद्ध सहस्त्र उठाव केला. युद्धाच्या वेळी इंग्रजांच्या सेनेला त्यांनी जंगजंग पछाडले. त्यांनी इंग्रज राजवटीसमोर कधीही आपले गुडघे न टेकता इंग्रजांसोबत घडलेल्या प्रत्येक युद्धात इंग्रज फौजांना अस्मान दाखविले. शौर्य आणि शौर्याचे प्रतिक म्हणजे क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके होते. आजही क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी केले.

आदिवासी मातृशक्ती विदर्भ कॉलनी ब्रह्मपुरी आणि ऑफ्रोड संघटना तालुका ब्रह्मपुरीच्या वतीने स्थानिक बास्केटबॉल ग्राउंड विदर्भ इस्टेट तीन मालडोंगरी रोड ब्रह्मपुरी येथे क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके जन्मोत्सव 2023 कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके जन्मोत्सव 2023 कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा. गेडाम सर उपस्थित होते. *कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी भूषविले.* प्रमुख अतिथी म्हणून शैलेश थोराने विदर्भ डेव्हलपर्स नागपूर, चांदेकर साहेब, गावडकर मॅडम, गावडकर सर, घनश्याम कुळमेथे सर,वकारजी खान, सुरज मेश्राम अध्यक्ष अ. जाती काँगेस शहर ब्रम्हपुरी यांची उपस्थिती होती.

यावेळी क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला मालार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित अतिथी यांनी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. पारंपारिक पद्धतीने आदिवासी बांधवानी आणि बालकलाकारांनी आदिवासी समाजाच्या वेशभूषेत नृत्य व संगीत सादर करून आदिवासी संस्कृतीचे सुंदर दर्शन घडले. घुसारी आणि डफरे यांच्या तालावर आदिवासी बांधव गोंडी गाण्यात नृत्य करण्यात दंग झाली. यावेळी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!