*शिंदे पिता – पुत्रांनी साधला मावळातील अपघातग्रस्त शिवभक्तांशी संवाद !*
*मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या संवेदनशीलतेचा पुनःप्रत्यय,अपघातग्रस्त सर्व शिवभक्तांच्या उपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून करण्याचा दिला शब्द*
*पुणे । प्रतिनिधी, दि १३, सोमवार*
मावळ तालुक्यातील शिलाटणे या गावातील शिवप्रेमी युवक शिवजयंतीनिमित्त शिवज्योत घेवून येत असताना ताथवडे येथे त्यांच्या गाडीला मागील बाजूने मालवाहतूक ट्रकने धडक दिली. या अपघातात जवळजवळ ३३ शिवभक्त जखमी झाले होते. सदरील अपघाताची माहिती संवेदनशील मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेबांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून या अपघातग्रस्तांवरील उपचाराचा संपूर्ण खर्च केला जाईल, असे आश्वासन दिले.
आज मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी आज रुग्णालयांना भेटी देत अपघातग्रस्तांच्या तब्येतीची विचारपूस केली. याचबरोबर कर्तव्यदक्ष व संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि खा.डॉ.श्रीकांतजी शिंदे यांनी देखील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने रुग्णांच्या तब्येतीची चौकशी केली.
*या अपघातग्रस्त शिवभक्तांना मदत मिळावी यासाठी मा.खा.श्रीरंग आप्पा बारणे व माजी मंत्री श्री बाळा भेगडे देखील सातत्याने पाठपुरावा करत आहेत*







