*मूलचेरा येथील कर्तबगार व होतकरू महिलांचा स्व. सुषमा स्वराज पुरस्काराने सन्मान*
गडचिरोली :- दि 13 मार्च
*भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मूलचेरा येथील स्वामी विवेकानंद छात्रावास येथे आज दिनांक 13 मार्च रोजी महिला मेळावा व स्वकर्तुत्वाने व परिश्रम घेऊन कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या व मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या कर्तबगार व होतकरू महिलांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी मोलमजुरी, शेतात काम करून , भाजीपाला विक्री करून कुटुंब सांभाळणाऱ्या व मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या कर्तृत्ववान स्त्री शक्तींना स्व. सुषमा स्वराज पुरस्कार देऊन भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्ह्याच्या प्रभारी वनिताताई कानडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.*
*कार्यक्रमाला महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, जिल्हा सचिव सुभाष गणपती, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता , महिला आघाडीचे गडचिरोली चे शहराध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री रश्मी बाणमारे , शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, मूलचेरा महिला आघाडी च्या तालुकाध्यक्ष भक्त, महामंत्री इत्यादी मान्यवर उपस्थित होते.*







