कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संपाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा पाठिंबा

72

*कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संपाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा पाठिंबा..!!*

 

*जिल्हा परिषदेचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली आंदोलनकर्ता कर्मचाऱ्यांची भेट..!!*

 

अहेरी – जुनी पेंशन योजना लागू करावे, या उद्देशाने राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरु झाले आहे.१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त राज्य सरकारी निमसरकारी तसेच सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना नवीन पेंशन योजना (NPS) रद्द करून जुनी पेंशन योजना (OPS) पुन्हा पूर्ववत लागू करावी, अश्या मागणीने सदर आंदोलन सुरु असून काल माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरी येथील आंदोलनकर्ता कर्मचाऱ्यांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला आहे.यावेळी शिक्षण कृती समिती तालुका शाखा अहेरी यांनी माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना विविध मागण्यांचे निवेदनही सादर केले. याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आंदोलनकर्ता कर्मचाऱ्यांना दिले..!!

 

यावेळी उपस्थित शैलेंद्र पटवर्धन उपाध्यक्ष नगरपंचायत अहेरी,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,दिलीप मडावी सरपंच वांगेपल्ली, सायलू मडावी सरपंच खमंनचेरु,अशोक येलमुले माजी उपसरपंच किस्टापूर वेल, गुलाबराव सोयाम माजी सरपंच,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह आदि उपस्थित होते..!!