*जागतिक महिला दिना निमित्य डॉ.राणी बंग याचा आधारविश्व फाऊंडेशन तर्फे सत्कार*
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आधारविश्व फाऊंडेशन तर्फे गडचिरोली जिल्ह्यातील सर्च संस्थेच्या संचालिका पदमश्री डॉ. राणी बंग यांचा नुकताच शाल, श्रीफळ आणी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे म्हणाल्या 1987 पासून मी राणी ताईंच्या सहवासात आली.गडचिरोली जिल्ह्यात दारूमुक्ती आंदोलनात त्यांच्या सोबत हिरीरीने भाग घेतला.तसेच त्यांच्या अनेक शिबीरात अनेक कार्यक्रमातही मी सोबत असायची. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले.तेव्हापासून राणी ताई मला मुलगीच मानायच्या.त्या माझ्या आदर्श, माझे प्रेरणा स्थान आहेत.आत्ताच काही दिवसापूर्वी इतक्या मोठ्या आजारातून उठल्या याचे चेहऱ्यावर शिकन नाही. इतका आनंदी आणी उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो.त्यांना खरं तर आरामाची गरज आहे पण तरी सुद्धा आजही त्या तितक्याच प्रेमाने, आत्मीयतेने रुग्णांना बघतात.यावरून त्यांना रुग्णांविषयी किती तळमळ आहे हे जाणवते.अजूनही त्या आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या नसतांना त्यांच्यातील इतकी ऊर्जा, इतका उत्साह बघुन तर आम्हाला त्यांच्या समोर नतमस्तकच व्हावे वाटते. असे आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे म्हणाल्या.डॉ. राणी बंग यांनी आधारविश्व फाऊंडेशन च्या कामाचे तसेच उपस्थित सर्व सदस्याचे भरभरून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. आज इतक्या आत्मीयतेने इतक्या जणी मला भेटायला आलात मला किती आनंद झाला शब्दात सांगू शकत नाही.आजारातून पूर्ण बरी झाल्यावर मला अजून खूप काम करायचे आहे आणी तुम्हा सर्वांसोबत काम करायला मला आवडेल असेही डॉ राणी बंग म्हणाल्या. सर्व उपस्थित सदस्या राणी ताईंच्या बोलण्याने भारावून गेल्या होत्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विजया चव्हाण आणी उज्वला शिंदे यांनी आधारविश्वची *हिच आमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे* ही प्रार्थना म्हटली. सत्कारानंतर अंजली देशमुख यांनी *कोमल है कमजोर नही तू शक्ती का नाम नारी है* हे गीत म्हटले. त्यावेळेस डॉ राणी बंग यांना अश्रू आवरले नाही. यावेळी आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे, उपाध्यक्षा विना जंबेवार, सचिव सुनीता साळवे, सदस्या विजया मने, अंजली देशमुख, सुनीता आलेवार, प्रिया निशाणे,विजया चव्हाण,उज्वला शिंदे,प्रणाली न्यालेवार, प्रीती मेश्राम,प्रतिमा सोनवणे, गायत्री गेडाम तसेच सर्च च्या सुनंदा खोरगडे उपस्थित होत्या.







