कृषी महाविद्यालय परिसरातील त्या वाघिणीला जेरबंद करण्यात  वनविभागाच्या पथकाला यश

76

कृषी महाविद्यालय परिसरातील त्या वाघिणीला जेरबंद करण्यात

वनविभागाच्या पथकाला यश

 

नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

 

गडचिरोली

दिनांक 20 फेब्रुवारी सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या आय टी आय चौकातील कृषी महाविद्यालयाच्या परिसरातील नर्सरीत वाघीण आढळून आल्याने एकचं खळबळ निर्माण झाली होती. तिच्यासोबत पिल्लू आढळून आल्याचे काहीच म्हणणे आहे.

 

शहराच्या मध्यभागी वाघिणीचे प्रवेश केल्यामुळे गडचिरोली शहरात दहशतीचे वातावरण पसरले होते .. या घटनेची माहिती कळताच वनविभागाने चंद्रपुर वरून विशेष पथक वाघिणीला जेरबंद करण्यास पाठविले. त्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाने साडे चार च्या सुमारास त्या वाघिणीला जेरबंद केले. या वाघिणीच्या पिल्ले मात्र आढलून आले नाही मात्र तरीही वनविभागाने शोध सुरू ठेवला आहे . ही वाघीण जेरबंद करण्यास यश मिळाल्यामुळे शहरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.