*शहरातील बुथ रचना मजबूत करा- आम. देवराव होळी*
*गडचिरोली येथे भाजप शक्ती केंद्र व बुथ प्रमुखांची बैठक*
गडचिरोली :- दि. 28 मार्च
*निवडणूक जिंकायची असेल तर शहरातील संपूर्ण बुथ रचना मजबूत करणे आवश्यक असून प्रत्येक बुथावर 30 प्लस एक अशी सक्षम कार्यकर्त्यांची फळी मजबूत करणे आवश्यक आहे शहरातील सर्व शक्ती केंद्रप्रमुखांनी व बुथ प्रमुखांनी आपाआपल्या बुथाची रचना व्यवस्थित करून आपला बुथ मजबूत करावा तसेच बुथावरील सर्व सदस्यांची सरल अॅप द्वारे माहिती भरून घ्यावी व सदर माहिती पक्षाकडे सादर करावी बुथ मजबूत केल्याशिवाय आपल्याला निवडणुकीत विजय प्राप्त करू शकता येत नाही त्यामुळे सर्वांनी आपली जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडून शक्ति केंद्र व बुथ मजबूत करावे व भारतीय जनता पार्टीचे कार्य सर्वसामान्य नागरिक व महिलांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी केले.*
*आज दिनांक 28 मार्च रोजी गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या महत्त्वपूर्ण शक्ति केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांच्या बैठकीला भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे , शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री महामंत्री वर्षा शेडमाके माजी न प उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता उरकुडे शहर महामंत्री केशव निंबोड विनोद देवोजवार, दलित आघाडीचे शहराध्यक्ष प्रा.उराडे सर, ज्येष्ठ नेत्या वछलाबाई मुनघाटे उपस्थित होत्या.*







