*माजी मंत्री राजे अंबरीशराव महाराज आत्राम यांनी दिला माणुसकीचा परिचय*
*बेघर महीलेला केली आर्थिक मदत*
सिरोंचा
सिरोंचा येथील वार्ड क्रमांक 6 मधील सायम्मा मार्गोनी यांचे काही महिन्यापूर्वी त्यांचे राहते घर पूर्णपणे कोसळले. दोन वर्षांपूर्वी त्यांचे पती व तीन महिन्यापूर्वी त्यांचा मुलाचे निधन झाले. त्यामुळें सायम्मा मार्गोनी यांचा आधार हरपला. अशातच घर कोसळल्याने तीच्यावर फार मोठे आर्थिक संकट कोसळले. ती महिला पूर्णपणे बेघर झाली होती.
मागील आठवड्यात माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव राव आत्राम हे सिरोंचा येथे दौऱ्यावर आले असता सिरोंचा येथील वार्ड नंबर 6 भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख दिलीप शसेनिगरपू यांनी राजे अंबरीशराव या महिलेची आपबिती सांगितली त्यावेळीच राजेंनी त्या महिलेच्या घरी भेट देऊन विचारपूस केली होती आणि त्यानंतर त्यांना आर्थिक मदत पाठवली. पाठवलेली आर्थिक मदत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय परिषद सदस्य सत्यनारायणा मंचालवार जिल्हा सचिव संदीप राचर्लावार युवा मोर्चाचे जिल्हा सचिव दिलीप शेनिगरपू रामू बोंगनी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली यावेळी या महिलेच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. तिने राजे अंबरीशराव महाराज आत्राम यांचे आभार मानले.







