*भाजप सरकार म्हणजे लुटारूचे सरकार* — महेंद्र ब्राम्हणवाडे
*मौशीखांब येथील कबड्डी स्पर्धेच्या उदघाट्नानिमित्त वक्तव्य*
गडचिरोली : भाजप सरकार हे लुटारूचे सरकार असून गोरगरीब जनेतला लटून उद्योगपतीना मोठे करण्याचे काम हे सरकार करत आहे. असा आरोप जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे. श्री छत्रपती शिवाजी राजे क्रीडा मंडळ मौशीखांब च्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कबड्डी स्पर्धेच्या उदघाट्न सोहळ्याप्रसंगी ते अध्यक्ष म्हुणुन बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले स्थानिक लोकप्रतिनिधिनी मागील नऊ वर्षांपासून मौशिखांब सारख्या मोठ्या गावाकडे लक्ष न दिल्याने अजुनही गावातील पायाभूत सुविधाचा विकास झालेला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा मागील सात महिन्यापासून एकही नियोजन समितीची बैठक झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या विकास कामात अडथळा येत आहे.
स्पर्धेचे उदघाट्क म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव डॉ. नितीन कोडवते, सहउदघाट्क म्हणून माजी आमदार रामकृष्ण मडावी मुख्यअतिथी म्हणून सरपंच रंजिताई पेंदाम, अनिल बनपूरकर, गुणाजी बोरकुटे, पांडुरंगजी समर्थ, नानाजी काळबांधे, पशुवैद्यकीय अधिकारी गराडे, उपसरपंच रुपाली गांधरवार, ग्रामसेवक ठाकरे, जयकुमार खेडेकर, विकास उंदीरवाडे, लोभाजी हर्षे, रमेश वाघाडे, यशवंत सालोटकर, नितेश राठोड सह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, सहभागी खेळाळू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







