*प्रभू श्रीरामचंद्र हे जगाचे आदर्श पुरुष*
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी*
*तळोधी ता.चामोर्शी येथे श्रीरामनवमी निमित्त भव्य श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन*
*अयोध्या येथील राममंदिर जगातील एक आश्चर्यच ठरणार*
*दिनांक ३० मार्च २०२३ गडचिरोली*
*वडिलांनी आज्ञा देताच कशाचाही विचार न करता वनवासात निघून जाणारे आज्ञाधारक पुत्र, एक पत्नी व्रतधारी, बजरंग बली या आपल्या भक्तासोबत बंधुत्वाची भावना ठेवणारे, वानर सेनेचे नेतृत्व करून अतीबलाढ्य लंका नरेश रावणाचा अंत करणारे , मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र हे संपुर्ण जगाचे आदर्श पुरुष असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी तळोधी ता.चामोर्शी येथील श्रीरामनवमी निमित्त आयोजीत श्रीराम जन्मोत्सवाचे प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.*
*यावेळी मंचावर विश्व हिंदू परिषदेचे विभागाचे अधिकारी श्रीरामायणजी खटी, जिल्हा मंत्री श्री बोरकर सर, डॉक्टर मिलिंदजी नरोटे, यांचेसह मान्यवर उपस्थित होते.*
*देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिराची निर्मिती सुरू असून जानेवारी २०२४ मध्ये या भव्य दिव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण देशाला होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी श्रीराम नवमी निमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्यात.*








