*चैत्र नवरात्री निमित्त बासंती पूजेला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती*
*◆मूलचेरा◆*: सुंदरनगर येथे दरवर्षीप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस युवा कमेटी द्वारा श्री.श्री.सार्वजनिक बासंती माता पूजा कमेटी कडून चैत्र नवरात्री निमित्त बासंती पूजेचे आयोजन करण्यात आले. या बासंती पूजेला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थिती राहून विधिवत पूजा करून दर्शन घेतले.
यावेळी हीतेश हलदार,दिपचंद दत्ता, भोला ढाली,सुरेश दास,समीर अधिकारी, हारू मजुमदार,कैलास डे, संजय पाल,शामोल पाल,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,विजय कुसनाके माजी सरपंच,जुलेख शेख,विनोद कावेरी सह मंडळाचे पदाधिकारी व भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.







