Home गडचिरोली *४ एप्रिलला गडचिरोलीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा* ...

*४ एप्रिलला गडचिरोलीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा*  *, जेष्ठ भाजपा नेते बाबुरावजी कोहळे यांचे आवाहन*

82

*४ एप्रिलला गडचिरोलीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा*

 

*, जेष्ठ भाजपा नेते बाबुरावजी कोहळे यांचे आवाहन*

 

*नागपूर येथील सावरकर विचारक श्री प्रसाद बर्वे हे प्रमुख वक्ते म्हणून येणार*

 

*यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन सावरकरांचा गौरव सन्मान वाढवावा*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर सायं ४ वा यात्रेचा प्रारंभ तर इंदिरा गांधी चौकातील सभागृहात होणार समारोप*

 

*दिनांक २ एप्रिल २०२३ गडचिरोली*

 

*भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य जाज्वल्य नेतृत्व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर काँग्रेस पक्ष व विरोधकांकडून होत चाललेल्या बदनामीकारक टीकेला उत्तर देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ दिनांक ४ एप्रिल २०२३ रोजी गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या गौरव यात्रेमध्ये राष्ट्रप्रेमी भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे यांनी इंदिरा गांधी चौकातील झालेल्या बैठकीच्या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना केले.*

 

*भारतीय जनता पार्टी शिवसेना व इतर हिंदू प्रेमी संघटना तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर समिती गडचिरोलीच्या वतीने या गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही गौरव यात्रा ४ एप्रिल २०२३ रोजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर सायंकाळी ४ वाजता सुरू होऊन शहरातील मुख्य बाजारपेठेतून इंदिरा गांधी चौकातील सभागृहामध्ये येईल व त्या ठिकाणी यात्रेचा समारोप करण्यात येईल . या यात्रेमध्ये सावरकरांवर प्रेम असणारे राष्ट्रभक्त, राष्ट्र प्रेमी नागरिक सहभागी होणार असून या यात्रेला मार्गदर्शन करण्यासाठी नागपूर येथील श्री प्रसाद बर्वे हे प्रमुख वक्ते म्हणून येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.*

 

*यावेळी जिल्हा भाजपा महामंत्री प्रशांतजी वाघरे, प्रमोदजी पिपरे, माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, जिल्हा सचिव अनिल पोहनकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी न प उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, महिला आघाडी अध्यक्ष कविताताई उरकुडे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लताताई लाटकर, वर्षाताई शडमाके , माजी नगरसेवक केशव निंबोड, भाजपा पदाधिकारी देवाजी लाटकर, विलास नैताम, विनोद देवोजवार, कोमल बारसागडे ,पल्लवी बारापात्रे, यांचे सह प्रमुख मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.*

 

*प्रत्येकाने आपल्या वार्डात जाऊन किमान १० घरी संपर्क करावा सावरकरांबद्दल सुरू असलेला काँग्रेस पक्षाचा बदनामीकारक प्रचार जनतेसमोर उघड करावा व या यात्रेत अधिकाधिक लोकांना सहभागी करून सावरकरांबद्दलचा सन्मान, गौरव वाढवावा असे आवाहन बाबुरावजी कोहळे यांनी या बैठकीच्या प्रसंगी केले.*

Don`t copy text!