*स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या प्रचार रथाला आमदार डॉ देवरावजी होळी यांनी दाखविली हिरवी झेंडी*
*गडचिरोली, धानोरा व चामोर्शी तालुक्यात करणार प्रचार*
*दिनांक ४ एप्रीलला धानोरा गडचिरोली येथे तर ६ तारखेला चामोर्शी येथे गौरव यात्रेचे आयोजन*
*दिनांक ३/४/२०२३ गडचिरोली*
*स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर समिती गडचिरोली व विविध हिंदू संघटनांच्या वतीने दिनांक ४ एप्रीलला धानोरा गडचिरोली येथे तर ६ तारखेला चामोर्शी येथे गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या गौरव यात्रेच्या प्रचार रथाला आमदार डॉ देवरावजी होळी यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.*
*यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे ,शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विलासजी दशमुखे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर , शहर महामंत्री विनोद देवोजवार, भाजपा युवा मोर्चाचे शहर महामंत्री राजभाऊ शेरकी बबन सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*








