Home गडचिरोली भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन* *नैनगुडम येथे...

भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन* *नैनगुडम येथे पहिल्यांदाच स्पर्धेचे आयोजन*

87

*भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन*

 

*नैनगुडम येथे पहिल्यांदाच स्पर्धेचे आयोजन*

 

अहेरी:-कमलापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नैनगुडम येथे जयसेवा क्लब तर्फे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, या स्पर्धेचे उद्घाटन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत,माजी उपसरपंच शंकर आत्राम,येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे,ग्रा.प.सदस्य वेंकटेश कडार्लावार,कृष्णा कीर्तीवार,राकेश गोदारी,वेंकटी उलेनंदल,सुदीप रंगूवार,लक्ष्मण रापेल्लीवार,स्नेहदीप आत्राम,हनमंतू कोडापे,इंदरशाही कन्नाके,वसंत सेगाम,बुचय्या सिडाम, सुरेश आलाम, नागेश सिडाम,गणपती आलाम,लसमय्या सिडाम,रामशाही मडावी,तुळशीराम आलाम,गंगुबाई सिडाम,चंद्रकला आलाम आदी उपस्थित होते.

 

नैनगुडम हे गाव अतिदुर्गम भागात असून गावात पहिल्यांदाच याठिकाणी भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला आहे.त्यासाठी प्रथम,द्वितीय तसेच तृतीय पारितोषिक आवश्यक असल्याने येथील युवकांनी भाग्यश्री ताई आत्राम यांच्याशी संपर्क केला.ताईंनी तिन्ही पारितोषिक पक्षातर्फे दिले.

 

या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात पारितोषिक असल्याने विविध भागातून अनेक संघांनी सहभाग नोंदविला आहे.पहिल्यांदाच आपल्या गावात व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन होत असल्याने गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. गावकऱ्यांनी ताईंचे आणि प्रमुख पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत केले.उदघाटन सोहळा संपताच ताईंनी स्वतः व्हॉलीबॉल मैदान गाजवत व्हॉलीबॉल स्पर्धकांमध्ये ऊर्जा निर्माण केले.

Don`t copy text!