*गरकापेठा येथे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन.*
*लोकवर्गणीतुन होणार पुतळ्याचे बांधकाम*
*📝सिरोंचा*:गरकापेठा येथे महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्यासंख्येने राहत असून येणाऱ्या नवीन पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासाची जाणीव असायला पाहिजे म्हणून तेथील गावकऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे बांधकाम करण्याचे ठरविले..!!
सदर पुतळ्याचे बांधकाम आविस पदाधिकारी व ग्राम पंचायत गरकापेठा च्या सहकार्याने होत असून त्या बांधकामाचे भूमिपूजन भारत राष्ट्र समिती चे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
*याप्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना माजी आमदार दिपकदादा यांनी सांगीतले की,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक,राजकीय व सांस्कृतिक कार्यातून लोकांनी प्रेरणा घेऊन आपली समाजाप्रती व देशाप्रती असलेली देशभावना व राष्ट्रभक्ती वाढीस लावावी.डाॅ.बाबासाहेबांचे अथांग शिक्षण पंडित होते.त्यांनी विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन स्वत:ला सिध्द केले व देशाला लोकशाही व धर्मनिरपेक्ष देश विकासात्मक संविधान दिले.आज आपला देश भारतीय संविधानामुळेच एकसंघ व महाशक्ती आहे. या महामानवाने विचार सतत इतरांना प्रेरित करून त्यातुन प्रेरणा मिळावी म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखीत ग्रथांचे वाचन आजच्या युवकांनी करावे ” वाचाल तर वाचाल” वाचन संस्कृती वाढीस लागने आज महत्त्वाचे आहे. वाचनातून आपल्याला थोर महामानवाने विचार समजतात असे माजी आमदार दिपक दादा यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगीतले…*
यावेळी आविस सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम,माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके, व्यंकटापूर सरपंच अजय आत्राम,गरकापेठा सरपंच सूरज गावडे,मादाराम सरपंच दिवाकर कोरेत,आविस सिरोंचा शहराध्यक्ष रवी सुलतान,आविस सल्लागार राजन्ना दुर्गम,आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,आविस सल्लागार दुर्गेश लंबडी,रवी दुर्गम,नागेश जाडी सह आविस व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी उपस्थित होते .






