Home गडचिरोली नेत्यांच्या नादी लागून आपापसात मारामाऱ्या केल्याने काहीच फायदा नसतो : हेमंत गडकरी*

नेत्यांच्या नादी लागून आपापसात मारामाऱ्या केल्याने काहीच फायदा नसतो : हेमंत गडकरी*

79

*नेत्यांच्या नादी लागून आपापसात मारामाऱ्या केल्याने काहीच फायदा नसतो : हेमंत गडकरी*

 

 

आपल्या नेत्यांवर प्रेम जरुर करा, निष्ठाही बाळगा पण अतीनादी लागून दुसऱ्या पक्षाच्या वा विचारधारेच्या कार्यकर्त्यांशी हाणामाऱ्या करू नका हे करून काहीच फायदा होत नसतो कारण ज्यांच्यासाठी तुम्ही कमालीचा वाईटपणा घेऊन नेहमीसाठी वैमनस्य घेता ते आपल्या टुमदार बंगल्यात डिनर डिप्लोमसी च्या माध्यमातून सेटिंग गेटिंग चे राजकारण करीत असतात असेआवाहन शिवराज प्रतिष्ठान चे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना केले, नुकताच ठाण्यात शिंदे व ठाकरे गटातील महिलांचा राडा तसेच मुंबईतील ताडदेव येथे राष्ट्रवादी व भाजप च्या कार्यकर्त्यात झालेल्या हाणामारीचा निषेध करून ते म्हणाले की गेली 33 वर्षे आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहो, मा.बाळासाहेब व राजसाहेब यांच्या वर प्रचंड प्रेम केले निष्ठा बाळगली पण इतर पक्षांच्या नेत्यांवर ,त्यांच्या धोरणांवर टीकाही खुप केली आक्रमक आंदोलनात सहभाग घेतला मात्र रक्तरंजित राजकारणाला आपला सदैव विरोध राहिला ,या उलट सर्व पक्षातील नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी नेहमीच चांगले संबंध ठेवण्यावर भर दिला, सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीने अत्यंत खालचे टोक गाठले आहे, अश्या वातावरणात राज्यातील युवा कार्यकर्त्यांनी भाईचारा सलोखा निर्माण करून झालेलं गढुळ वातावरण चांगलं होण्याच्या दृष्टीने पाऊले टाकावी,नेत्यांची खूष मर्जी सांभाळण्यासाठी वेडी वाकडी पावले टाकू नका , चांगली जनहितार्थ कामे करून स्वतःची ओळख निर्माण करावी कारण कुठलाच नेता कायमस्वरूपी पाठीशी रहात नाही हा अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना आलेला अनुभव आहे,त्यामुळे पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक जरूर रहा मात्र आपापसात हाणामाऱ्या करून दुश्मनी घेऊ नका भविष्यात ते उपयोगी पडत नाही असेही हेमंत गडकरी म्हणाले.

Don`t copy text!