संस्कृती सांस्कृतिक भवन गडचिरोली येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
गडचिरोली: आरमोरी रोडवर असलेल्या संस्कृती सांस्कृतिक भवन येथील हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले . दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सकाळी होमहवन करून पूजा अर्चना संस्कृती सांस्कृतिक भवन येथील संचालक श्री सुनील केशवराव पोरेड्डीवार यांनी केली. नंतर महिलां मंडळींच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नंतर महाप्रसादाचे वितरण करून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.कार्यक्रमात विविध आप्तेष्ट मंडळीं,मित्रमंडळीं,व विविध नागरिकांनी महाप्रसाद व विविध कार्यक्रमांचा लाभ घेतला.







