*विकास योजनांचा पूर्ततेतून ग्राम खेड्यांचा विकास साधा – माजी मंत्री वडेट्टीवार*  ——————————————————————————–  *सावली पं.स. आमसभा – पशुसंवर्धन, कृषी, आरोग्य, विज विभागांवर ताशेरे*

65

*विकास योजनांचा पूर्ततेतून ग्राम खेड्यांचा विकास साधा – माजी मंत्री वडेट्टीवार*

——————————————————————————–

*सावली पं.स. आमसभा – पशुसंवर्धन, कृषी, आरोग्य, विज विभागांवर ताशेरे*

—————————————

 

*दिनांक : १० मार्च २०२३*

*सावली*

 

*ग्रामीण विकासाचा संपूर्ण गाडा हाकण्याची जबाबदारी पंचायत समिती विभागाची आहे. मात्र सदोष कार्यप्रणाली व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईच्या धोरणामुळे ग्रामीण नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून अनेकांची कामे रेंगाळलेली असल्याची वस्तुस्थिती आज पंचायत समितीच्या आमसभेत निदर्शनास आली. विकासाचा गाडा हाकणाऱ्यांकडून कर्तव्यात तीळ मात्रही कुचराई नको अशी तंबी देत विकास योजनांच्या पुर्ततेतून ग्राम खेड्यांचा विकास साधवा असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. सोबतच आमसभेत गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. तर आयोजित आमसभेत पशुसंवर्धन आरोग्य, व कृषी विभागावर नागरिकांनी ताशेरे ओढले.*

 

*आज सावली येथील पंचायत समिती सभागृहात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.*

*सदर सभेस अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार उषा चौधरी, गटविकास अधिकारी जगन्नाथ तेलकापल्लिवार, नायब तहसीलदार सागर कांबळे , वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरुटकर, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन गोहने, माजी प.स.सभापती विजय कोरवार, सरपंच संघटना अध्यक्ष पुरुषोत्तम चुधरी,माजी तालुकाध्यक्ष राजेश सिद्धम ,माजी जि.प. सदस्य योगिता डबले, माजी प.स.सदस्या मनीषा जवादे , माजी पं. स. सदस्य गणपतराव कोठारे, प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.*

 

*आयोजित वार्षिक साधारण सभेत मागील वर्ष सन 2021- 22 या आर्थिक वर्षाचा कार्य अहवाल वाचन करण्यात आला. सोबतच सन 2022-23 चा अहवाल सादर करताच विविध विभागाच्या कार्यप्रणालीवर दोषांचा ठपका ठेवत ताशेरे ओढले. यावर सभाध्यक्ष माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांनी पशुसंवर्धन , कृषी, विज वितरण पुरवठा आरोग्य, विभागाच्या कार्यप्रणाली बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावरून तसेच पंचायत विभागाच्या विकासकामा संदर्भातील कुठलीही कुचराई नको.* *सोबतच नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवा अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी तंबी देखील दिली. ग्रामीण भागात विकासाचा दुवा म्हणून पंचायत समितीची यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे.* *ही जबाबदारी पेलणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने ग्रामीण नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सर्वतोपरी प्रयत्नातून विकासाचा गाडा हाकलत ग्रामीण भागाचा विकास साधावा. असे होत नसल्यास कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईतून त्यांना मिळणारे वेतन भत्तेही थांबवण्यात येतील अशी तंबी देत माजी मंत्री, आमदार वडेट्टीवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडसावले.*

 

 

*यावेळी सावली तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामसेवक व पंचायत समितीचे कर्मचारीवृंद यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.*

 

——————————————————————————-

*बॉक्स- सावली तालुक्यातील विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण करत मनमानी कारभाराचा पाढा युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष मंबत्तुलवार यांनी वाचला येथील यावर सभाध्यक्ष माजी मंत्री वडेट्टीवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. तसेच केवळ बिल न भरणाऱ्या शेतकरी, नागरिक यांचे कनेक्शन कापण्यात मग्न न राहता ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांना प्राधान्य क्रमाने सोडवा असे आदेश यावेळी सभाध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.*