गानली समाज शिक्षण व कल्याण मंडळ, गडचिरोली तर्फे मृतकाच्या परिवारास आर्थिक मदत

78

गानली समाज शिक्षण व कल्याण मंडळ, गडचिरोली तर्फे मृतकाच्या परिवारास आर्थिक मदत

गडचिरोली ता.प्र.

              गानली समाज शिक्षण मंडळ, गडचिरोलीच्या वतीने श्रीमती कलुबाई विठोबाजी मनबतुलवार रा.बोरमाळा ता.सावली जि. चंद्रपूर हल्ली मुक्काम गोकुलनगर गडचिरोली यांचे दुःखद निधन झाले.त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने आपण समाजाचे काही देने आहोत ही उदात्त भावना ठेवून सामाजिक बांधिलकी ठेवून मंडळाने मृतकाच्या परिवारास आर्थिक मदत केली.यावेळी गानली समाज शिक्षण व कल्याण मंडळाचे अधक्ष्य प्रकाश तोडेवार, रवींद्र आयतुलवार, बंडू वडेट्टीवार,नितीन संगीडवार सदस्य व नातेवाईक उपस्थित होते.