*30 एप्रिल चा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक शक्ती केंद्रावर व मंडळावर आयोजित करा*
*महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी योगिताताई पिपरे यांचे आवाहन*
गडचिरोली :- दि. 27 एप्रिल
नमस्कार !
*देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मा नरेंद्रजी मोदी, यांचा रविवार दि.३० एप्रिल,२०२३ रोजी १०० वा “मन कि बात” कार्यक्रम आहे. हि मन कि बात प्रत्येक शक्ती केंद्रावर किमान १०० जणांच्या ऊपस्थितीत ऐकायची व बघायची आहे. आपल्या जिल्हयातील प्रत्येक शक्तीकेंद्रावरील हा कार्यक्रम कुठे होणार व या कार्यक्रमासाठी कोणाला प्रमुख नियुक्त केले आहे याची मंडलश: सविस्तर माहीती कृपया तातडीने विदर्भ कार्यालयात किंवा 8263003715 या मोबाईल नंबर वर Whats App करावी तसेच कार्यक्रमानंतर लगेच कार्यक्रमाचे फोटो देखील अपलोड करावेत किंवा ऊपरोक्तच मो क्र वर WhatsApp करावे अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, पूर्व विदर्भाचे संघटन मंत्री डॉ उपेंद्रजी कोठेकर, महिला आघाडी च्या प्रदेश अध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांनी दिलेल्या आहेत.*
*तरी भाजप महिला आघाडी च्या सर्व जिल्हा महामंत्री, जिल्हा उपाध्यक्ष, सचिव, तालुका अध्यक्ष, महामंत्री, शहर अध्यक्ष, महामंत्री व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक शक्ती केंद्रावर व मंडळावर मन की बात कार्यक्रम आयोजित करून त्याचे फोटो 8263003715 या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवावे असे आवाहन महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांनी केले आहे.*
*माहीती कृपया तुम्हाला दिलेल्या Format मध्येच पाठवावी… जिल्हा-मंडलाचे नांव-विधानसभेचे नांव- शक्तीकेंद्राचे नांव-समाविष्ठ बुथ संख्या-मन कि बात प्रमुखाचे नांव-मोबाईल क्र-मन कि बात कार्यक्रमाचे स्थान इत्यादी माहिती वरील व्हाट्सएप नंबर वर पाठवावे असे आवाहन महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी सौ योगीताताई पिपरे यांनी केले आहे.*







