*!!भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पक्ष संघटन कार्यात सक्रिय सहभागी राहून,पक्ष बळकटी चे काम करावे!!*

62

*!!भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पक्ष संघटन कार्यात सक्रिय सहभागी राहून,पक्ष बळकटी चे काम करावे!!*

*!!खासदार अशोकजी नेते यांचे प्रतिपादन!!*

———————————————–

*!!भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने बालाजी मंगल कार्यालय ता. चामोर्शी येथे भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न!!*

———————————————–

*दिनांक २१ मे.२०२३*

चामोर्शी:- महाजनसंपर्क अभियान दि.३० मे ३० जून सबका साथ सबका ! विकास याद्वारे जिल्हा कार्यकारिणीची बैठक,बालाजी मंगल कार्यालय चामोर्शी या ठिकाणी आयोजित करण्यात आली.

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करून भारत माता, पंडित दीनदयाल उपाध्याय, डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

जिल्हा कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी मार्गदर्शन करतांना बूथ सशक्तिकरण अभियान, संगठनात्मक कार्य,जिल्हा पातळीवर सुरू असलेल्या बूथ रचने बाबत आढावा घेऊन उर्वरित बुथ रचना लवकरात लवकर पुर्ण करावी.केंद्र व राज्य शासनाच्या संपूर्ण योजना ची माहिती देत, मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी याकरिता सरल ॲप ,मोदी ॲप,यासह आवश्यक असणाऱ्या सोशल मीडियावरील ॲप डाऊनलोड करून त्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याने या जनकल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे अशा विविध संगटनात्मक विषयांवर पदाधिकारी-कार्यकर्त्यांना विस्तृत मार्गदर्शन खासदार अशोकजी नेते यांनी केले.

पुढे बोलतांना यासोबतच दि.२८ मे रोजी होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करण्यासंदर्भात सर्वांनी बुथनिहाय नियोजन करावे अशी सुचनाही बैठकीदरम्यान केले.

त्यानंतर, खासदार अशोकजी नेते यांनीही जिल्हयातील उर्वरित बुथ रचना व अन्य संगटनात्मक कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन केले.

गडचिरोली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नवनिर्वाचित निवडून आलेल्या संचालकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

मंचावर आमदार डॉ.देवराव होळी,आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे,महामंत्री प्रमोद पिपरे, महामंत्री गोविंद सारडा, प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा चे प्रकाश गेडाम,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबुभाई हुसैनी, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप कोरेत, प्रदेश सदस्या रेखाताई डोळस, माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे,जिल्हा नियोजन समिती चे नवनिर्वाचित सदस्य सदानंद कुथे,भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश भुरसे,किसान आघाडीचे तथा नवनिर्वाचित कृ.उ.बा.समिती चामोर्शी चे संचालक रमेश बारसागडे, माजी सभापती रंजिता कोडाप, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख,व पदाधिकारी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.

उपस्थितांना आमदार डॉ. देवराव होळी,आमदार कृष्णाजी गजबे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,यांनी मार्गदर्शन केले.

संचालन जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,व आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष दिलीप चलाख यांनी केले

या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीला जिल्हातील प्रमुख पदाधिकारी, भाजपाचे शक्ती केंद्रप्रमुख , बूथ प्रमुख यांचे सह जिल्हातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.