ताडगाव कमल गॅस एजन्सी च्या मनमानी कार्यावर आळा घालण्यासाठी तहसीलदार साहेबांना निवेदन…..

136

ताडगाव कमल गॅस एजन्सी च्या मनमानी कार्यावर आळा घालण्यासाठी तहसीलदार साहेबांना निवेदन…..

उज्वला योजनेचे अंदाजे 300 गॅस कनेक्शन ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना न देता, आपल्या मर्जीने मौजा ताडगाव येथील गॅस एजन्सी येथे ट्रान्सफर केले आहे. ज्या ग्राहकांचे गॅस कनेक्शन तडगाव येथे ट्रान्सफर केले आहे

एटापल्ली :- तालुक्यातील चंदनवेली व गेदा ग्रामवासियांना मिळालेल्या प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत उज्वला योजनेचे गॅस कनेक्शन पवन एच. पि. गॅस वितरक एटापल्ली यांचे कडून मौजा ताडगाव येथील कमल गॅस वितरक यांनी अनेक नागरिकांचे उज्वला योजनेचे अंदाजे 300 गॅस कनेक्शन ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना न देता, आपल्या मर्जीने मौजा ताडगाव येथील गॅस एजन्सी येथे ट्रान्सफर केले आहे. ज्या ग्राहकांचे गॅस कनेक्शन तडगाव येथे ट्रान्सफर केले आहे, त्या गॅस कनेक्शन धारकांना लॉक डाऊन काळात केंद्र सरकार कडून तीन महिने मोफत मिळणारे तीन गॅस हंडे मिळालेले नाहीत तसेच नियमित गॅस खरेदी केल्यानंतर त्यांच्या खात्यावर जमा होणारी गॅस सब्सीडी सुद्धा सदर ग्राहकांना मिळालेली नाही, त्यामुळे सदर ग्राहकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे.
एटापल्ली तालुक्यातील नागरिकांना भामरागड तालुक्यात जाऊन गॅस खरेदी करावे लागणार असल्यामुळे सदर नागरिकांची गैरसोय होईल त्यांना वारंवार भामरागड तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेल्या ताडगाव येथे जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे ज्या नागरिकांचे गॅस कनेक्शन ताडगाव येथील गॅस एजन्सीने ट्रान्सफर केले आहेत, त्या सर्व ग्राहकांचे गॅस कनेक्शन एटापल्ली तालुक्यातील पवन गॅस वितरक एटापल्ली येथे जैसे थे ट्रान्सफर करून देण्यात यावे. जर कमल गॅस एजन्सी ताडगाव यांनी ज्या ज्या ग्राहकांचे गॅस कनेक्शन ट्रान्सफर केले आहे,त्यांचे गॅस कनेक्शन एटापल्ली येथे ट्रान्सफर करून न दिल्यास ताडगाव येथील कमल गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी.
असे निवेदन चंदनवेली गावातील काही नागरिकांकडून नायब तहसीलदार साहेबांना देण्यात आला. निवेदन सादर करतांना श्री. मा. खेळचंद वैरागडे सामाजिक कार्यकर्ते ,उमेश मडावी , बारीकराव सडमेक,मणिराम इस्टाम,चरणदास नैताम,उमेश एन्कटी मडावी,साईनाथ मेश्राम. सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.