नगराध्यक्ष चषक क्रिकेट सामन्यातील अंतिम सामन्यांमध्ये नगर परिषद स्वच्छता कर्मचारी संघ विजयी ठरला
बल्लारपूर:- दैनंदिन जीवनात खेळाचे महत्व पटवून देण्यासोबतच, नेहमीच्या कामातून काहीसा विरंगुळा आणि शहरात खेळीमेळीचे वातावरण निर्माण व्हावे, याकरीता शहरात येत्या ३० जानेवारी पासून स्टेडियम ग्राऊंड येथे ‘नगराध्यक्ष चषक क्रिकेट’ सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. आज दि.०२ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता संपन्न झालेल्या अंतिम सामन्यात नगर परिषद स्वच्छता कर्मचारी विजयी ठरला आहेत.
यामध्ये नगराध्यक्ष नगरसेवक, माजी नगर सेवक संघ,पत्रकार, पोलीस, डॉक्टर, वकील, व्यापारी संघ, कंत्राटदार संघ, तालुका अधिकारी संघ, नगर परिषद शिक्षक संघ, स्वास्थ विभाग कर्मचारी संघ,नगर परिषद कर्मचारी संघ अश्या १२ विविध संघानी या ‘नगराध्यक्ष चषक क्रिकेट सामन्यांमध्ये सहभागी झाला होता. या शुखलेत विजय मिळविण्यासाठी सर्वच संघांनी सरावाच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू केली होती.
आज या स्पर्धेचा अंतिम सामना दि. २ जानेवारी दुपारी २ वाजता झाला. या अटीतटीच्या सामन्यात नगर परिषद स्वच्छता विभाग संघ आणि पोलीस संघात, मोठा अटीतटीच्या सामन्यात जोरदार खेळी खेळत नगर परिषद स्वच्छता कर्मचारीसंघ अंतिम फेरीत विजयी झाले आहेत.
तर दुसरीकडे हे सामने यशस्वीपणे पार पडावे, याकरिता नगर परिषदे’च्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे यंदा नगराध्यक्ष चषक’मध्ये कुठला संघ विजयी ठरतो यासाठी शहरवासीयांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मात्र, या सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळी खेळत नगर परिषद स्वच्छता कर्मचारी संघांनी विजय मिळवून या नगराध्यक्ष चषकावर आपले नाव कोरले आहेत.