_*निलज येथे ज्ञानदान श्रीमद हरिनाम भागवत सप्ताहाचा समारोप*_

25

_*निलज येथे ज्ञानदान श्रीमद हरिनाम भागवत सप्ताहाचा समारोप*_

 

_*समारोपीय कार्यक्रमाला माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांची विशेष उपस्थिती*_

 

_ब्रम्हपुरी/प्रतिनिधी_

_तालुक्यातील निलज येथे ज्ञानदान श्रीमद हरिनाम भागवत सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम दिनांक २३ एप्रिल २०२४ रोज मंगळवारला हनुमान जयंतीदिनी संपन्न झाला. १७ तारखेपासून निलज गाववासीय जनता तथा श्री गणेशदत्त मंडळ निलज यांच्या सौजन्याने या ज्ञानदान श्रीमद हरिनाम भागवत सप्ताहाला सुरुवात झाली होती. मागील सात दिवसांपासून निलज येथील सार्वजनिक हनुमान मंदिराच्या आवारात गोंदिया जिल्ह्यातील येगावं येथील ह.भ.प. काशिनाथ मेंढे महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतुन गावातील नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले._

_भागवत सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी *विशेष अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर हे उपस्थित होते.* तर प्रमुख अतिथी म्हणून अण्णाजी ठाकरे बाबुसाहेब, उमेश धोटे सरपंच चौगान, सुचित्राताई ठाकरे संचालिका जि.म.स.बँक चंद्रपूर, हेमंत ठाकरे सरपंच निलज, शंकर कोपुलवार उपसरपंच निलज, अशोक भुते, प्राचार्य धनराज चौधरी, रवींद्र ढोरे माजी सरपंच खरकाळा, योगेश ढोरे सदस्य से.स..सो.खरकाडा,देवचंद ठाकरे सदस्य से.स.सो. रुई, उत्तम बनकर सदस्य से.स.सो. रुई, दादाजी भर्रे उपाध्यक्ष से.स.सो. रुई, नारायण मेश्राम ग्रा.पं.सदस्य, शिलाताई सोंदरकर ग्रा.पं.सदस्या, संजय भुते ग्रा.पं.सदस्य, कवळुजी बुल्ले, मारोती नखाते, संजय भुते ग्रा.पं.सदस्या, पांडुरंग नखाते, ज्ञानेश्वर ठाकरे, भविका मांढरे ग्रा.पं.सदस्या, देवीदास दोनाडकर, सुरज मैंद पो.पा., सुखरू ठाकरे, लोकमान्य पिलारे, तुकाराम लोखंडे, भगवान मिसार, अशोक पिलारे यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते._

_या भागवत सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, भागवत सप्ताह म्हणजे ज्ञानयज्ञ सोहळा आहे. त्यामुळे त्यातील तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे, मानवता हाच आपल्या धर्माचा आधार आहे. मनुष्य हा विचारांनी आणि कर्मांनी स्वतःसाठी आणि इतरांसाठी उत्तम भविष्य निर्माण करू शकतो. माणसाने माणसाप्रमाणे व्यवहार करून विकास साधणे व आनंद निर्माण करून घेणे हाच खरा धर्म असल्याचे स्पष्ट होत जाते. असे त्यांनी सांगितले._