Home गडचिरोली राजाराम पोलीस स्टेशन कडून अंगणवाडीला साहित्य वाटप

राजाराम पोलीस स्टेशन कडून अंगणवाडीला साहित्य वाटप

178

राजाराम पोलीस स्टेशन कडून अंगणवाडीला साहित्य वाटप

उपपोस्टे राजाराम खांदला हददीतील राजाराम गावातील अंगणवाडी क्र 1 ची सेविका नामे सावित्रीबाई राजण्णा मोतकूलवार यांनी उपपोस्टेला आधारकार्ड कॅम्प चालू असताना येवून सागितले की, राजाराम अंगणवाडी क्र 1 ला 50 मुले असून अंगणवाडीमध्ये फॅन, लहान मुलांना बसण्यासाठी मॅट, घड्याळ सरस्वतीचा फोटो तसेच सावित्रीबाई फुले यांच्या फोटोची अत्यंत आवश्यकता आहे सदर बाबत माहीती दिल्याने उपपोस्टेचे अधिकारी व अमलदार यांनी लागलीच राजाराम अगणवाडी क्र 1 ला फॅन, लहान मुलाना बसण्यासाठी मॅट, घडयाळ, सरस्वतीचा फोटो तसेच सावित्रीबाई फूलें यांचा फोटो असे सामान देवून माणूसकीचे दर्शन घडविले यामुळे परीसरामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे कौतूक होत आहे.

Don`t copy text!