*राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत ५० वी ग्रंथभेट योजनेसाठी निवड झालेल्या ग्रंथांची यादी जाहीर*

19

*राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत ५० वी ग्रंथभेट योजनेसाठी निवड झालेल्या ग्रंथांची यादी जाहीर*

 

गडचिरोली, दि. 01 ऑक्टोबर (जि.मा.का.) :

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता आणि राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या ५० व्या ग्रंथभेट योजना अंतर्गत निवड झालेल्या ग्रंथांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सन २०२३ मध्ये प्रकाशित व ग्रंथालय संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी १३८८ ग्रंथांची निवड केली आहे. यात मराठी ७४९, हिंदी २९७ आणि इंग्रजी ३४२ ग्रंथांचा समावेश आहे.

 

ही संपूर्ण यादी ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. २६ सप्टेंबर २०२५ ते दि. १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेत निवड झालेल्या ग्रंथांचे वितरण किमान २५ टक्के सवलतीसह करणे बंधनकारक आहे.

 

सदर ग्रंथयादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत हरकती, आक्षेप किंवा सूचना असल्यास संबंधितांनी दि. १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगरभवन, मुंबई – ४०० ००१ यांच्याकडे कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात हस्त बटवडयाने, पोस्टाने किंवा संकेतस्थळावर नमूद केलेल्या ई-मेलवर पाठवाव्यात. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या सुचनांचा विचार करण्यात येणार नाही.

 

ग्रंथांच्या नाव, लेखक, प्रकाशक किंवा किंमतीमध्ये काही तांत्रिक बदल आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास त्याचे स्वागत केले जाईल, असे प्र.ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी आवाहन केले आहे.