देऊळगाव येथे दिनांक 6/12/2025 रोजी चक्का जाम आंदोलन

39

देऊळगाव येथे दिनांक 6/12/2025 रोजी चक्का जाम आंदोलन.

 

देऊळगाव येथे दिनांक 6 डिसेंबर ला वाघाचा बंदोबस्त करा,शेतकर्यांना वाघा पासुन स्वसंरक्षण द्या, हत्ती च्या नुकसानिची रक्कम वाढवा या व इतर मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात जंगली हिंस्र प्राण्याचे माणसांवर हल्ले वाढलेले आहे.

आरमोरी तालुक्यातील मौजा देऊळगाव व इंजेवारी क्षेत्रात वाघाचे हल्ले वाढलेले आहेत. एक महिण्यात वाघाचे चार घटना घडल्या आहेत. डोंगरसावगी येथे एका महिलेवर वाघाने हल्ला केला पण ती बचावली. त्यानंतर 19 नोव्हेंबर ला मौजा देऊळगाव येथे दोन महिला वाघाचा हल्लात मृत्युमुखी पडले .त्या नंतर लगेच 14 दिवसांत मौजा इंजेवारी येथील एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले.

या मुळे परिसरात जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेतकर्यांना शेतात जाऊन काम करणे अवघड झाले आहे. विद्यार्थीना सकाळी व्यायाम करणे अवघड झाले आहे.

परंतु वनविभागाने अजुनहि वाघाला पकडले नसल्याने शेतकरी, शेतमजूरा मध्ये मोठा रोष व्यक्त होत आहे .

वाघाचा बंदोबस्त करा,ज्या शेतकऱ्यांची वाघाचा अडचणी मुळे शेती पेरली नाही त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या साठी देऊळगाव येथे रास्ता रोको आंदोलन व ठिंया आंदोलन 6 डिसेंबर ला होणार आहे या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकरी, शेतमजूर , जनतेनी सहभागी होण्याचे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड अमोल मारकवार