मतीमंद दिव्यांगांसाठी कायदेशीर पालकत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

25

मतीमंद दिव्यांगांसाठी कायदेशीर पालकत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

गडचिरोली, (जिमाका) दि. २९ : जिल्ह्यातील मतीमंद (बौद्धिक दिव्यांग) प्रवर्गातील १८ वर्षे व त्यावरील दिव्यांग व्यक्तींना कायदेशीर संरक्षण व सामाजिक सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने नॅशनल ट्रस्ट अधिनियम, १९९९ अंतर्गत लोकल लेव्हल कमिटी (एल.एल.सी.) मार्फत कायदेशीर पालकत्व देण्याची प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडे या योजनेसाठी अपेक्षित प्रमाणात अर्ज प्राप्त झाले नाही.

त्यामुळे जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी मतीमंद प्रवर्गातील पात्र दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज लोकल लेव्हल समितीकडे सादर करावेत, असे कळविले आहे. अर्ज प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.