*परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू*

32

*परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू*

 

गडचिरोली, (जिमाका) दि. २९ : गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयात ३१ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध स्पर्धा व भरती परीक्षा तसेच ४ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट–ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा होणार असल्याने, परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

 

जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये हे आदेश लागू केले असून, या कालावधीत पाचपेक्षा जास्त व्यक्तींची जमावबंदी, घोषणाबाजी, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर, शस्त्रे व स्फोटक साहित्य बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच अनधिकृत व्यक्ती व वाहनांना प्रवेशबंदी राहील. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.