Home गडचिरोली रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात साखळी उपोषणाला बळ

रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात साखळी उपोषणाला बळ

157

रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात साखळी उपोषणाला बळ

 

 

नगराध्यक्षा रेखा मोहूर्ले यांची थेट भेट; जाहीर पाठींब्याने प्रशासनावर दबाव

 

 

एटापल्ली–देवडा–गडचिरोली, एटापल्ली–जारावंडी व एटापल्ली–हेडरी–गट्टा या प्रमुख रस्त्यांची अवस्था अक्षरशः मृत्यूचे सापळे बनली असून, या गंभीर प्रश्नाविरोधात सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आज एटापल्ली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रेखा मोहूर्ले यांनी प्रत्यक्ष भेट देत जाहीर पाठींबा दिला.

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे रोज अपघात घडत असून नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. ही स्थिती अत्यंत दुर्दैवी व प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण असल्याचे सांगत नगराध्यक्षा रेखा मोहूर्ले यांनी संबंधित यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत नगराध्यक्षा रेखा मोहूर्ले यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला. यावेळी उपोषणस्थळी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!