*_गडचिरोलीत भक्ती, उत्साहात श्रीराम जन्मोत्सव जल्लोषात साजरा, मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण व सावरकर चौकाचे नामकरण!_*
गडचिरोली | दि. २६ मार्च २०२६
गडचिरोली शहरात श्रीराम नवमी निमित्त आयोजित करण्यात आलेला प्रभू श्रीराम जन्मोत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण शहरात धार्मिकतेचा आणि आनंदाचा उत्सव दिसून आला. या पवित्र सोहळ्यात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी आपल्या परिवारासह सपत्नीक सौ.अर्चना नेते कुटुंबासमवेत उपस्थित राहून प्रभू श्रीरामाची विधीवत पूजा-अर्चा करत मनोभावे आरती केली.
या कार्यक्रमात महिला मंडळाने सादर केलेल्या भजन-कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला. पारंपरिक सुरात गायलेली रामभक्ती गीतं आणि सामूहिक पूजनामुळे उपस्थित भाविकांच्या मनात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हा या सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरला.
*महाप्रसाद वितरणातून सेवाभावाचा संदेश*
श्रीराम नवमीच्या औचित्याने आयोजित विशेष कार्यक्रमात मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी स्वतः उपस्थित राहून भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले.
“प्रभू रामाची सेवा हीच जनसेवा आहे,” या भावनेतून त्यांनी स्वतःच्या हस्ते प्रसाद वितरण करत समाजसेवेचा आदर्श दर्शविला.या महाप्रसादाला मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
*‘स्वातंत्र्यवीर सावरकर चौक’चे नामकरण – राष्ट्रभक्तीचा सन्मान*
या मंगलदिनी मा.खा.डाँ. अशोकजी नेते यांच्या शहरातील निवास जवळील एका प्रमुख चौकाचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चौक’ असे नामकरण करून त्याचे लोकार्पण मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचे प्रखर विचार मांडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने चौक ओळखला जाणार असल्याने नागरिकांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. यामध्ये नरेंद्र बोरकर सर, नंदुभाऊ कुमरे, शंकर माकडे सर, पवन गेडाम, मनोज मारगोनवार, अरूण कतलपवार, रविंद्र निंबोरकर, श्रीपदवार जी, मारोती कुनघाडकर, माधुरी मैद, रजनी वानखेडे, विदया बोरकर, निता कतलपवार, उरकुडे ताई तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सजावट, रोषणाई आणि जयघोषाने दुमदुमले शहर
ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईमुळे उत्सवाची शोभा अधिकच खुलून आली.
“जय श्रीराम” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तीचा आनंद झळकत होता.
या प्रसंगी मा.खा. डॉ. अशोकजी नेते एक संदेश देत म्हणाले
“रामनवमी हा केवळ सण नसून तो आदर्शांचा उत्सव आहे. सावरकरांच्या नावाने चौकाचा शुभारंभ होणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
एकंदरीत, गडचिरोलीतील हा श्रीराम जन्मोत्सव भक्ती, सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रभावनेचा सुंदर संगम ठरला.





