गडचिरोली जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा घेतला आढावा
मृत्युदर कमी करण्यासाठी लसिकरण महत्वाचे
जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला दिली भेट
गडचिरोली:- जिल्हयातील कोरोना मृत्युदर कमी करण्यासाठी अधिकाधीक नागरिकानी कोविड लासिकरण करावे असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली असता केले. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्हयातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला व जिल्हयात लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश यावेळी विरोधी पक्ष नेते मा देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले.यावेळी माजी ऊर्जामंत्री तथा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखरजी बावनकुळे, गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दिपकजी सिंगला, जी.प.सि. ई .ओ. कुमार आशीर्वाद, नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत शंभरकर, यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
याप्रसंगी देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतांना जिल्ह्यात किती प्रमाणात लसीकरण झाले याबाबतची माहिती घेतली. जिल्हयातील अधिकाधीक लोकांना लस कशी उपलब्ध होईल व अधिकाधीक लसीकरण कसे होईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले व त्याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश यावेळी दिले.






