मास्क अन् लस हेच कोरोना विरोधी एक कवच!
माझे दोन्ही डोस झालेले आहेत मी स्वस्थ आहे.मास्क,सुरक्षित अंतर अन् लस हेच सुरक्षा कवच आहेत:-आमदार डॉ देवराव होळी
गडचिरोली :- गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने व सतत पाठपुराव्याने गडचिरोली जिल्ह्यातील पाच नवीन लसीकरण केंद्र शनिवार पासून सुरू केले जाणार आहेत त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा ग्रामीण रुग्णालय देसाईगंज , प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाला , कन्यका मंदिर अहेरी , ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे लसीकरण केंद्र शनिवार पासून सुरु होणार आहे ,त्यासाठी आजपासून नोंदणी करण्याचे आव्हान आमदार डॉ देवराव होळी यांनी केले यावेळी आमदार डॉ देवराव होळी यांनी सांगितले गडचिरोली जिल्हात 45 वर्षांवरील नागरिकांसाठी 48 लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे व 18 ते 44 वयोगट नागरिकांसाठी 7 लसीकरण केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे
आमदार डॉ होळी यांनी गडचिरोली विधानसभा मतदार संघातील समस्त लसीकरण केंद्राचा स्वतः आढावा घेतला व सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैदकिय अधीक्षक यांना लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश दिले व लसीकरण मोहिमेत हलगर्जी पणा
खपऊन घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी या लसीकरण केंद्राचा लाभ घ्यावा व सर्वांनी लसीकरण करून घ्यावे
व आमदार डॉ होळी यांनी सांगितले मास्क आणि लस हेच कोरोना विरोधी एक कवच आहे मी स्वतः दोन्ही डोज घेतले आहे मी स्वस्थ आहे व सुरक्षीत आहे आपणही वेळ
न दवडता आजच नोंदणी करा व आपल्या कुटुंबाची लसीकरण करून घ्या आणि सुरक्षित राहा व दुसऱ्यांना सुरक्षित करा असे जिल्हा वासियांना जाहीर आव्हान केले
बोदली येथील लसीकरण केंद्रात स्वतः उपस्थित राहून लोकप्रतिनिधी व नागरिकांना लसीकरण
करवून घेताना आमदार डॉ देवराव होळी सोबत गडचिरोली तालुका आरोग्य अधिकारी सुनील मडावी






