जिल्हा मुख्यालयापासून 10 किलोमीटर अंतरावरील जंगल परिसरात घडली घटना.
गडचिरोली:-
गडचिरोली शहरापासून 10 किलोमीटर च्या अंतरावर असलेल्या महादवाडी व कुऱ्हाडी जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडणीसाठी गेलेल्या दोन महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली.
कल्पना दिलीप चुदरी वय 37 वर्ष रा महादवाडी ता.जि. गडचिरोली व सिंधू दिवाकर मुनघाटे वय 63 वर्ष रा कुऱ्हाडी ता. जि. गडचिरोली अशी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृत महिलांची नावे आहे.या घटना एकाच परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या.
या परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून नरभक्षी वाघाने हैदोस घातला असून त्याला जेरबंद करण्याची मागणी करूनही वनविभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.