सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाला शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांची भेट व विविध विषयांवर तेथील डाँक्टरांशी चर्चा
सिरोंचा:- माननीय एकनाथ शिंदे साहेब. पालकमंत्री गडचिरोली जिल्हा तसेच गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख किशोर पोतदार साहेब व माजी आमदार तथा जिल्हा सहसंपर्कप्रमुख रामकृष्ण मडावी साहेब. यांच्या आदेशानुसार येथील सिरोंचा कोविड सेंटर. तसेच रुग्णालय येथे भेट देऊन तेथील परिस्थिती आढावा व परिस्थिती जाणून घेण्याकरता दिनांक 10.05.2021 सोमवार ला माननीय शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती गडचिरोली राजगोपालजी सुल्वावार व तसेच त्यांच्यासोबत शिवसेना तालुकाप्रमुख सिरोंचा अमित त्रीपट्टीवार,दुर्गेशजी तोकला शिवसेना तालुका संमन्वयक सिरोंचा,सुभाष भाऊ घुटे शिवसेना तालुकाप्रमुख अहेरी ग्रामीण. व्यंकटेश कंदीवार,महेंद्र सुल्वावार उपस्थित होते. सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन डाँक्टर यांच्याशी चर्चा करण्यात आली.असताना त्यांनी त्या ठिकाणी कशा कशाची कमतरता आहे. याविषयी माहिती दिली त्या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर तात्काळ उपलब्ध करून द्या तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता.व तसेच गाड्यांची कमतरता डॉक्टरांनी सांगितले. आम्ही लगेच गाडीवाल्याना बोलून. याठिकाणी आजपासून दोन गाड्या उपलब्ध करून देण्यात आले आणि ऑक्सीजन सिलेंडर एक ते दोन दिवसात उपलब्ध करून देऊ असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांनी येथील डॉक्टरांना सांगितले. तसेच तेथील पेशंटला घाबरण्याचे काहीच आवश्यकता नाही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आरोग्य विषयी लागणारे साहित्य कमी पडू देणार नाही असे जिल्हाप्रमुख साहेबांनी सांगितले.