Home गडचिरोली कनेरी ग्रा. पं. सदस्य प्रभाकर लाकडे, चंद्रभागा कुमरे यांचे सदस्यत्व रद्द

कनेरी ग्रा. पं. सदस्य प्रभाकर लाकडे, चंद्रभागा कुमरे यांचे सदस्यत्व रद्द

198

शासकीय जागेवर अतिक्रमण पडले महागात

गडचिरोली: ग्रामपंचायत कनेरी येथील ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर विष्णु लाकडे आणि ग्रामपंचायत सदस्या चंद्रभागा घनश्याम कुमरे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी काळ 12 मे रोजी आदेश काढून दोघांचेही ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केले आहे.
कनेरी येथील अजय गेडाम यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे 12 मार्च 2021 रोजी यांचेकडे अर्ज दाखल करून गैरअर्जदार प्रभाकर लाकडे, चंद्रभागा कुमरे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. यावर सुनावणी होऊन जिल्हाधिकारी यांनी दोघांचेही सदस्यत्व रद्द केले आहे.

Don`t copy text!