Home गडचिरोली जागतिक आदिवासी दिवस साधेपणाने साजरा करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

जागतिक आदिवासी दिवस साधेपणाने साजरा करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

182

गडचिरोली,(जिमाका)दि.06:- दिनांक 09 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. त्यानिमित्त आदिवासी बांधव मोठया प्रमाणात एकत्र येऊन सण साजरे करत असतात. परंतु कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव बघता यावेळी आदिवासी दिवस साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

आपत्ती व्यवस्थापनांतर्गत विविध उपाय योजनांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असल्याकारणाने येणार आदिवासी दिन ही सर्व नागरिकांनी सार्वजनिक रित्या साजरा न करता घरीच आयोजित करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
**

Don`t copy text!