Home गडचिरोली आरमोरी नगर परिषदेचा अभियंता प्रदीप मेश्राम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात गुन्हा दाखल

आरमोरी नगर परिषदेचा अभियंता प्रदीप मेश्राम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात गुन्हा दाखल

124

गडचिरोली:-आरमोरी नगर परिषदेचा अभियंता प्रदीप मेश्राम वय 30 याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरनी गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई आज 1डिसेंबर रोजी करण्यात आली.तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा निधी त्याच्या खात्यावर जमा करण्यासाठी अभियंता प्रदीप देवराव मेश्राम याने दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.शेवटी तडजोडीत आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने प्रदीप मेश्राम याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, सहाय्यक फ़ौजदार प्रमोद ढोरे,पोलिस हवालदार नत्थु धोटे,राजेश पदमगिरीवार,स्वप्नील बांबोळे, किशोर जोजाळकर,श्रीनिवास संगोजी,संदीप घोरमोडे, किशोर ठाकूर,संदीप उडान,ज्योत्स्ना वसाके, चालक तुळशीराम नवघरे यांनी केली आहे.

Don`t copy text!