Home गडचिरोली मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ

191

गडचिरोली, (जिमाका) दि.02 :- दिनांक ०१ जानेवारी, २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ दिलेली आहे. या कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे – दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी निर्धारीत कालावधी दिनांक ०१ नोव्हेंबर, २०२१ (सोमवार) ते दिनांक ३० नोव्हेंबर,२०२१ (मंगळवार) होता. सुधारीत कालावधी दिनांक ०१ नोव्हेंबर,२०२१ (सोमवार) ते दिनांक ०५ डिसेंबर, २०२१( रविवार). दावे हरकती निकालात काढणे निर्धारीत कालावधी दिनांक २० डिसेंबर, २०२१(सोमवार) पर्यंत होता. सुधारीत कालावधी दिनांक २० डिसेंबर, २०२१ (सोमवार) पर्यंत, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी निर्धारीत कालावधी दिनांक ०५ जानेवारी, २०२२ (बुधवार) होता. सुधारीत कालावधी दिनांक ०५ जानेवारी, २०२२ (बुधवार) राहील, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

Don`t copy text!