9 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरिक्षक व निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती

86

गडचिरोली, (जिमाका) दि.07 :- राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 24 डिसेंबर 2021, रोजीच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्हयातील नगर पंचायत, अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, चामोर्शी, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, व कोरची या 9 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम-2021 जाहिर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या वरील निवडणूक कार्यक्रमाचे अनुषंगाने विभागीय आयुक्त नागपूर, विभाग नागपूर यांनी आयोगाच्यावतीने अधिकाऱ्यांची मुख्य निवडणूक निरिक्षक व निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्या पुढील प्रमाणे कुमार आशिर्वाद, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद, गडचिरोली, मो.क्र.9871017596, ईमेल ceozpgadchiroli@gmail.com (मुख्य निवडणूक निरिक्षक), नगर पंचायत, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, चामोर्शी, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा व कोरची, फरेंद्र कुत्तीरकर, उप मुख्यकार्यकारी, अधिकारी, जिल्हापरिषद, गडचिरोली, मो.क्र.9404817216, ई-मेल zpgadmail@gmail.com (निवडणूक निरिक्षक), नगर पंचायत, चामोर्शी, अहेरी, व सिरोंचा, बसवराज भिमप्पा मस्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली, मो.क्र. 9822049910, इमेल -dsaogad15@gmail.com (निवडणूक निरिक्षक) नगर पंचायत, कोरची, कुरखेडा, व धानोरा, अशोक गराटे , उपायुक्त चंद्रपूर, महानगरपालिका, चंद्रपूर, मो.क्र.9422301743, ईमेल-com.chandrapur@gmail.com (निवडणूक निरिक्षक) नगर पंचायत, मुलचेरा, एटापल्ली, व भामरागड, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी कळविले आहे.