स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सीवी वर्षा निमित्ती आंबा माहोर संरक्षण रब्बी हंगाम 2021 मोहिम स्वरुपात राबविणे बाबत

98

गडचिरोली, (जिमाका) दि.17 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मार्फत रब्बी हंगाम 2021 मध्ये राबवावयाच्या मोहिमे अंतर्गत “आंबा माहोर संरक्षण” या विषयांबाबत प्रचार, प्रसिध्दी व जनजागृती कार्यक्रम दिनांक 4.1.2022 रोजी आयोजित केला आहे. बदलत्या वातावरणामुळे लांबलेला पाऊस, त्यामुळे आंबा मोहोर येण्यास विलंब, अधिक उत्पादनासाठी कीड व रोगापासुन संरक्षण, आंब्याच्या मोहोर व फळांवर येणाऱ्या किडी व रोगांमुळे फळांच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर विपरित परिणाम होतो.
आंबा या पिकावर वेगवेगळया जवळपास 185 किडी आढळतात, मात्र त्यापैकी तुडतुडे, खोडकिडा, फळमाशी, पिठ्या ढेकूण, शेंडे पोखरणारी अळी व फुलकिडे या किडीचा तसेच करपा व भुरी इ. रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत आहे, त्यामुळे आंबा मोहराचे संरक्षण करणे आवश्यक आहे. आंबा मोहराचे कीड व रोगांपासून संरक्षण करून उत्पादन वाढवणे यावर वेबिनार मध्ये चर्चा करण्यात येणार आहे. कृषि विभाग,महाराष्ट्रन शासन यांचे मार्फत “विकेल ते पिकेल अभियांनातर्गत” वेबिनार मालिका ‘चर्चा करु शेतीची कास धरु प्रगतीची’ सप्ताहातील दर बुधवारी आयोजित करण्यात येते. या मालिकेच्या दि.4.1.2022 रोजीच्या भाग-66 करीता डॉ. कैलास मोते संचालक फलोत्पादन,कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व डॉ. बी. डी. शिन्दे , प्रमुख अन्वेषक (हॉर्टसॅप) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,यांचे आंबा यापिकांवरील आंबा माहोर संरक्षण यांबाबत मार्गदर्शन आयोजित केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री.खंडेराव रामराव सराफ कृषि उपसंचालक (फलो-३) करणार असून सुत्रसंचालन श्रीमती मनिषा भोसले तंत्र अधिकारी (फलो-3) करणार आहेत. हा कार्यक्रम कृषि विभागाच्या youtube. Channel https:// www.youtube.com /c/ Agriculture Department GoM या लिंकवरुन शेतक-यांना पहाता येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त आंबा उत्पादकांनी सहभागी होऊन आंबा माहोर संरक्षण बाबत मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. कैलास मोते संचालक, फलोत्पाेदन यांनी केले आहेत.
राज्यस्तरावरील मुख्य कार्यक्रमाव्यतीरीक्त क्षेत्रीय स्तरावर प्रत्येंक मंडळ कृषि अधिकारी कार्यक्षेत्रामध्ये दि. 4/1/2022 रोजी आंबा माहोर संरक्षण या विषयांबाबत,किमान एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी- शास्त्रज्ञ परिसंवाद, क्षेत्रिय भेटी, शेतीशाळा, शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, शेतकरी सभा इत्यादीचे आयोजन करण्यात येणार आहे .सदर कार्यक्रमासाठी कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, संशोधन संस्थाचे शास्त्रज्ञ, आंबा पिकामधील प्रगतशील शेतकरी व कृषि विभागाचे तज्ञ अधिकारी सहभागी होवुन मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर कार्यक्रमध्ये जास्तीत जास्त आंबा उत्पादक शेतक-यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संचालक, फलोत्पादन यांनी केले आहे.