जिला परीषद शाळा एट्टापल्ली येथे मं.गाधी व लाल बहादूर शास्त्री यांची जंयती साजरी

68

जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची आज दि.02 ऑक्टोबर 2022रोजी सकाळी 08.00 वाजता जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.गणेश आत्राम आणि प्रमुख अतिथी म्हणून श्री प्रमोद रामटेके हे उपस्थित होते. सोबतच प्रा. गोपाल घोडेस्वार, श्री मनोज इरले, प्रा.कु. कीर्ती डोंगरे,प्रा. कु. प्रतिमा करमरकर आणि प्रा. कु ममता लेकामी यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांच्या जीवनावर आधारित गीतांचे गायन केले आणि भाषण प्रस्तुत केले. तसेच शालेय परिसराची स्वच्छता करून स्वच्छता हीच ईश्वरसेवा हा संदेश दिला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्य विनय चव्हाण सर यांनी मार्गदर्शन केले होते.