कूनघाडा येथे भव्य रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उद्घाटन आशीष पिपरे नगरसेवक यांच्या हस्ते संपन्न
दिनांक -16 नोहेंबर 2022
चामोर्शी – तालुक्यातील कुणघाडा येथे जय गलबल्या बापू स्पोर्टीग क्लब कुणघाडाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रात्रकालीन अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट सामने उद्घाटन नगरसेवक
आशीष भाऊ पिपरे यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचिरोली चिमूर लोकसभा सोशल मीडिया प्रमुख
रमेश अधिकारी प्रमुख पाहुणे भाजप नेते उमेश कुकडे ,रमेश कोठारे , पितांबर वासेकर ,व पदाधिकारी उपस्थित होते* उपस्थितांना नगरसेवक आशीष भाऊ पिपरे ,अध्यक्ष रमेश अधिकारी यांनी मार्गदर्शन केले
येथे उपस्थित शेकडो युवा जणांना मार्गदर्शन करतांना आशीष भाऊ पिपरे यांनी सांगितले युवकांनी सांघिक भावनेने खेळ खेळावे व एकसंघ भावना जोपासून एकमेकांना साथ देणारी संकल्पना जोपासावी व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा पुढाकार घ्यावा परंतु निष्क्रिय लोकप्रतिनिधी यांना घडा
शिकवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले यावेळी येथील आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश वासेकर यांनी केले यावेळी या भव्य उद्घाटन सोहळ्यात या पंचक्रोशीतील शेकडो युवक व येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रामुख्याने
जय गलबल्या बापू स्पोरटिंग क्लब अध्यक्ष राहुल रक्षणवार , उपाध्यक्ष गोलू मडावी ,सचिव गणेश पिपरे , क्रीडा प्रमुख साहिल वडेट्टीवार व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते






