*नागपूर येथील आदिवासींच्या महाआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा आमदार डॉ देवरावजी होळी यांचे आवाहन

73

*नागपूर येथील आदिवासींच्या महाआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा आमदार डॉ देवरावजी होळी यांचे आवाहन

 

*जिल्हयातील आदिवासी कृती समीतीच्या वतीने दिनांक २१ डिसेंबर रोजी नागपुर विधानभवनावर महाआक्रोश मोर्चा*

 

*दिनांक १८/१२/२०२२ गडचिरोली*

 

*गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी कृती समीतीच्या वतीने नागपूर विधानभवनावर दिनांक २१ डिसेंबर रोजी आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी आयोजित करण्यात आलेल्या महाआक्रोश मोर्चात आदिवासीं बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी यांनी केले आहे.*

 

*अधीसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना दिलेले संरक्षण त्वरित रद्द करण्यात यावे, नोकरीतील आदिवासी समाजाचा अनुशेष भरण्यात यावा, वन हक्क कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात यावी, बोगस आदिवासींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, पेसा कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्यात यावी , अशा विवीध मागण्यांसह आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी नागपूर विधानभवनावर महा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याकरिता दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता यशवंत स्टेडियम नागपूर येथे आदिवासी बांधवांनी मोठया संख्येने एकत्रित येऊन विधानभवनावरील मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.*