प्रजासत्ताक दिनी डॉ.नरेश बिडकर यांचा सत्कार.

89

प्रजासत्ताक दिनी डॉ.नरेश बिडकर यांचा सत्कार.

गडचिरोली,प्रतिनिधी:- जिल्ह्यातील सुप्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ.नरेश बिडकर यांचा प्रजासत्ताक दिनी शासनाकडून पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. गडचिरोली येथील सिंधु आर्थोपेडीक मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, गडचिरोली चे संचालक डॉ.नरेश बिडकर यांनी शासनाच्या आरोग्य विभाग चे उपक्रम अंतर्गत आयुष्यमान भारत,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु करून जिल्ह्यातील अनेक अपघातात जखमी झालेल्या गरीब रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करून या योजनेचा लाभ मोफत मिळवून दिला. ही योजना राबविणारी जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात सिंधु हॉस्पिटल एक आहे. यांच्या सेवा गुणवत्तेची शासनाच्या आरोग्य विभागाने दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिला आहे.सदर पुरस्कार प्रजासत्ताक दिनी गडचिरोली येथे पोलीस मैदनावर आयोजित भव्य कार्यक्रमात जिल्हाधिकारीं संजय मीना यांनी डॉ.नरेश बिडकर यांना प्रदान केला आहे.