सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगवान चन्नावार यांचा अभिनव उपक्रम
lo
मुल ता.प्र.-
गेवरा बूज.ता. सावली जि. चंद्रपूर व आता मुल येथे वास्तव्यास असलेले भगवान भास्करराव चन्नावार यांनी स्वतःचा वाढदिवस व सेवानिवृत्त झाल्यानंतर कोणताही कार्यक्रम व पार्टीचे आयोजन न करता ज्या ज्या ज्या शाळेत आजपर्यंत सेवा दिली. तेथील शाळेत 5000 रुपये किंवा वस्तूरूपाने मदत कराची जेणेकरून त्या शाळेला मदत होईल.असे ठरविले. व त्याची सुरवात त्यांनी नुकतीच 26 जानेवारीचे औचित्य साधून मुल तालुक्यातील चांदली बूज.व भादुरणी शाळेला 5000 रुपयेची मदत देऊन केली. या अभिनव उपक्रमांचे कौतुक करण्यात येत आहे. अशा प्रकारे वाह्यात पैसा खर्च न करता असे उपक्रम राबविले पाहिजे. असा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आव्हान त्यांनी केले आहे.







