Home गडचिरोली चिखली येथे सावली तालुका महिला काँग्रेस कमीटीच्या अध्यक्षा उषाताई भोयर यांच्या नेतृत्वाखाली...

चिखली येथे सावली तालुका महिला काँग्रेस कमीटीच्या अध्यक्षा उषाताई भोयर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकरणी गठीत व आढावा बैठक संपन्न

90

*चिखली येथे सावली तालुका महिला काँग्रेस कमीटीच्या अध्यक्षा उषाताई भोयर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकरणी गठीत व आढावा बैठक संपन्न*

दिनांक: 14-02-2023

सावली तालुका महिला काँग्रेस कमीटीच्या अध्यक्षा उषाताई भोयर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकरणी गठीत व आढावा बैठक संपन्न झाली. या कार्यक्रमच्या अध्यक्षा गावच्या प्रथम नागरिक व सरपंच सौ.रेखाताई बाणबले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला.

 

राज्याचे माजी मंत्री व लोकनेते आद.विजय भाऊ वडेट्टीवार यांचा राजकीय विचारांचा वारसा घेऊन,तसेच ग्रामीण महिला या राजकारणात सक्रिय व्हाव्या यासाठी आज दिनांक 14-02-2023 ला सकाळी 11:00 वाजता तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर यांनी चिखली येथे जाऊन महिला ग्राम काँग्रेस कमिटीची स्थापन केली.व विविध विषयावर चर्चा करून आढावा बैठक घेण्यात आली.

त्यात चिखली महिला ग्राम कमिटीच्या अध्यक्षा म्हणून सौ.ज्योती मुक्तेश्वर बाणबले यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष – सौ.नलिनी हरिंद्र मसराम, सचिव – सौ.ज्योती विनोद मुरादे, तर कोषाध्यक्ष म्हणून सौ.सुष्मा अरुण निमरट, आणी सदस्य म्हणून सौ.द्वारका रमेश घुबडे, सौ.कल्पना रामदास मसराम, सौ.लता केवळराम मशाखेत्री, सौ.उज्वला क्रीष्णा बाणबले, सौ.कुसुम कालिदास धोटे, सौ.उज्वला विकास महागमवार, सौ. शुभांगी दशरथ कुसराम , सौ.जिजा रुषीजी ठाकूर यांची व इतर महिलांची निवड झाली.

महिलांना शुभेच्छा देत पक्षवाढीसाठी त्यांचे मनोबल वाढविले.या वेळी चिखली गावातील समस्त महिला काँग्रेस कार्यकर्ते उपस्थिती होते.

Don`t copy text!