जवराबोडी मेंढा येथे रणसंग्राम कबड्डी 2023 चे आयोजन माजी जि. प. सदस्य प्रमोद भाऊ चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
ब्रम्हपुरी/
तालुक्यातील जवराबोडी मेंढा येथे शिव छञपती युवा क्रिडा मंडळ जवराबोडी मेंढा यांच्या वतीने कबड्डीप्रेमिंसाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जवराबोडी मेंढाच्या बाजूला विनोदभाऊ चिमूरकर यांच्या भव्य आवारात रणसंग्राम कबड्डी 2023 डे नाईट भव्य प्रो. कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.
या कबड्डी स्पर्धेचे *उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडला.* यावेळी सहउद्घाटन म्हणून चौगानचे सरपंच उमेश धोटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पं. स. सदस्य थानेश्र्वर कायरकर, उपाध्यक्ष म्हणून जवराबोडी मेंढाचे सरपंच देवरावभाऊ उईके उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून भावनाताई ईरपाते, मंगलाताई लोणबले, विवेकानंद थेरकर उपसरपंच जवराबोडी मेंढा, अविनाश शेंडे मा.सरपंच जवराबोडी मेंढा,बबन लडके ग्रा.पं. सदस्य, दिवाकर निकुरे,प्रशांत मेश्राम, वामन निकुरे अ.तं.स., सुषमाताई कुंभरे पो. पा., डोमाजी सहारे, पुरुषोत्तम चापले, महादेव घरत, आनंदराव थेरकर, टिकाराम पा. थेरकर, रामेश्वर पा. थेरकर, सचिन नन्नवरे व अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, अभ्यासाबरोबरच खेळही महत्त्वाचे आहेत. अशा कार्यक्रमांमुळे गावातील कलागुणांना पुढे जाण्याची संधी मिळते. कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या खेळाडू व गावकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, खेळात एकच हरतो आणि एकच बाजू जिंकते, जो संघ चांगली कामगिरी करतो तोच विजेता ठरतो. क्रीडा कलागुणांना वाव देण्यासाठी शिव छञपती युवा क्रिडा मंडळ जवराबोडी मेंढाचा हा अप्रतिम उपक्रम खेळाडूंचा उत्साह वाढवेल. या स्पर्धांमुळे खेड्यापाड्यातील खेळाडू मधील कलागुण शोधून त्यांना राष्ट्रीय पातळीवर नेण्यास मदत होणार होईल. अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ही रणसंग्राम कबड्डी 2023 डे नाईट भव्य प्रो. कबड्डी स्पर्धा चार दिवसीय असेल. एका गावाचा एकच संघाचा समावेश राहील. या स्पर्धेमध्ये हजारोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. रणसंग्राम कबड्डी 2023 डे नाईट भव्य प्रो. कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघास माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडून 20 हजार रोख आहे. द्वितीय पारितोषिक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्याकडून 15 हजार रुपये रोख, तृतीय पारितोषिक 10 हजार रुपये रोख तर चतुर्थ पारितोषिक5 हजार रुपये रोख देण्यात येईल. शिव छञपती युवा क्रिडा मंडळ जवराबोडी मेंढा यांच्याकडून आकर्षक चषक ठेवलेले आहे. त्याचबरोबर स्पर्धेतील उत्कृष्ट रेडर, डिफेंडर, ऑलराऊंडर तसेच अनेक पारितोषिक ठेवले आहेत.






